उमरेड: दक्षिण उमरेड वनपरीक्षेत्रात पट्टेदार वाघाचा मृत्यू; वनविभागाकडून तपास सुरू
Umred, Nagpur | Jun 13, 2026 नागपूर वनविभागाच्या दक्षिण उमरेड वनपरीक्षेत्रातील मौजे चनोडा शिवारात एका पट्टेदार वाघाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.सकाळी स्थानिक ग्रामस्थांकडून वनकर्मचाऱ्यांना चनोडा शिवारात वाघ मृत अवस्थेत आढळल्याची माहिती मिळाली. वन विभागाने घटनास्थळी धाव घेतली असता, वनकक्ष क्रमांक ३६४ पीएफ लागून असलेल्या नाल्यात हा मृतदेह आढळून आला.