सेलू: विकास चौकात मोपेड गाडीवर देशी-विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस सेलू पोलिसांनी केली अटक; 77 हजारांचा मुद्देमाल जप्त
Seloo, Wardha | Oct 26, 2024 अवैधरित्या देशी-विदेशी दारूची दुचाकी वाहनाने वाहतूक करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली असून त्याचे ताब्यातून दारुसह 77 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई दि. 26 शनिवारी मध्यरात्री 02.30 वाजताचे सुमारास सेलूच्या विकास चौकात सेलू पोलिसांनी केली. सुलभ ज्ञानेश्वर डायगव्हाणे वय 27 रा. वाहितपुर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मध्यरात्री 4.30 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.