सेलू: सुकळी, वाहितपूर, कान्हापूर आणि मोर्चापूर शिवारात तालुका कृषी विभागाकडून कपाशी पिकाची पाहणी, शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन
Seloo, Wardha | Oct 25, 2024 तालुक्यातील काही भागात कपाशी पिकावर विवीध कीडरोगाची लागण झाल्याची शेतकऱ्यांची ओरड होताच आज ता. 25 शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या चमूने सुकळी स्टेशन, वाहीतपुर, मोर्चापुर, कान्हापुर या परीसरात पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.