सेलू: वानरविहिरा शिवारात गावठी दारू भट्टीवर सेलू पोलिसांची धाड; एक लाख 60 हजारांचा मुद्देमाल नष्ट
Seloo, Wardha | Oct 25, 2024 गावठी मोहा दारू काढण्यासाठी तयार केलेला मोहा रसायन सडवासह 1 लाख 60 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी धाड टाकून नष्ट केला. ही कारवाई ता. 24 गुरुवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मौजा वानरविहीरा शिवारात सेलू पोलिसांनी केली. याप्रकरणी रात्री 10.30 वाजता आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.