सेलू: बोरी व सेलू शहरात गावठी दारू विकणाऱ्या 3 जणांवर सेलू पोलिसांची कारवाई, मोहा दारुसह 7 हजार 400 चा मुद्देमाल जप्त
Seloo, Wardha | Oct 23, 2024 गावठी मोहा दारूची विक्री करतांना पोलिसांनी धाड टाकून 3 दारू विक्रेत्यांना ताब्यात घेत त्यांचे कडून मोहा दारूसह 7 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कैलास मांढरे वय 54 रा. सेलू, किशोर गणपत राऊत वय 44 रा. बोरी व कवडू चिंतामण पारिसे वय 54 रा. सेलू असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई ता. 22 मंगळवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास करण्यात आली. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.