सेलू: नानबर्डी येथे पतीची क्षुल्लक कारणातून पत्नीला मारहाण, सेलू पोलिसांत तक्रार दाखल
Seloo, Wardha | Oct 25, 2024 विभक्त राहणाऱ्या पतीने पत्नीला क्षुल्लक कारणातून मारहाण केल्याची घटना ता. 24 गुरुवारी सकाळी 10.30 वाजता तालुक्यातील नानबर्डी येथे घडली. याप्रकरणी सौ. शीतल स्वप्नील काळसर्पे वय 23 रा. नानबर्डी यांनी स्वप्नील कवडुजी काळासर्पे रा. नानबर्डी याचे विरुद्ध दुपारी 12.30 वाजता तक्रार दाखल केली. अशी माहिती सेलू पोलिसांनी दिली.