सेलू: हिंगणी येथे वरली मटकाचा जुगार चालविणाऱ्यावर सेलू पोलिसांची कारवाई
Seloo, Wardha | Oct 24, 2024 वरली मटका व सट्टा पट्टीचा जुगार चालविणाऱ्यावर सेलू पोलिसांनी कारवाई करून 870 रुपये रोख रक्कम जप्त केली. ही कारवाई ता. 24 गुरुवारी दुपारी 3.50 वाजता हिंगणी येथे बाजार चौकात करण्यात आली. सनी राजू रॉय रा. हिंगणी असे आरोपीचे नाव आहे. त्याचे विरुद्ध सायंकाळी 5.20 वाजता पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.