उमरेड: अथक संघर्षाला यश! मौजा हेवती पुनर्वसन येथे WCL बाधितांना भूखंडांचे वितरण; माजी आमदार सुधीर पारवे यांचा गौरव
Umred, Nagpur | Apr 8, 2026 गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या हक्कासाठी लढा देणाऱ्या वेकोलि बाधित हेवती पुनर्वसन येथील ग्रामस्थांच्या संघर्षाला अखेर मोठे यश आले आहे. आज एका विशेष कार्यक्रमात बाधित नागरिकांना त्यांच्या हक्काच्या प्लॉटचे वितरण करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आणि ग्रामस्थांच्या लढ्याचे खंबीर नेतृत्व करणारे माजी आमदार सुधीर पारवे यांचा यावेळी सत्कारमूर्ती म्हणून गौरव करण्यात आला.