उमरेड: उमरेड पोलिसांची मोठी कारवाई:लाखांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त
Umred, Nagpur | Apr 22, 2026 उमरेड पोलिसांनी 'बाळाजी ट्रेडर्स' या दुकानावर छापा टाकून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखू जप्त केला. १४८.७२४ किलो वजनाचा, एकूण २,४८,७५० रुपये किमतीचा प्रतिबंधित तंबाखू जप्त करण्यात आला आहे.आरोपी: जग्गू अरुण शाहू (वय ४०, राहणार सोनेझरी नगर, उमरेड) याला अटक करण्यात आली आहे.आरोपीवर भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.