पेण: ३५ तासांनंतर अष्टमी शहरात पुराचे पाणी ओसरले
Pen, Raigad | Jul 7, 2026 कुंडलिका नदीला पूर आल्यानंतर अष्टमी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. गेले ३५ तास अष्टमी पुराच्या पाण्याच्या विळख्यात होते. ३५ तासांपेक्षा जास्त कालावधीनंतर पाणी ओसरले आहे. पहाटेपासून पाणी ओसरायला सुरुवात झाल्यानंतर नागरिकांनी घरातली साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील घरात, दुकानात नागरिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गेली दोन दिवस वीज नाही, मोबाईल नेटवर्क नाही, खाण्यापिण्याच्या समस्या होत्या.