शहादा: दामळदा, तलावडी आणि लक्कडकोट येथे सिमेंट काँक्रिट बंधारा बांधकामाचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते भूमीपूजन
शहादा तालुक्यातील दामळदा आणि तलावडी, लक्कडकोट येथे सिमेंट काँक्रिटीकरण बंधारा बांधकामाचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील, कृउबा संचालक मयुर पाटील,माजी जि.प.सदस्य सुनील चव्हाण, डॉ.किशोर पाटील, किशोर मोरे,राजा पाटील, उपसभापती श्रीराम पाटील,पंकज बागल,रमेश पावरा,विरसिग पाडवी,दामळदा उपसंरपच डॉ विजय चौधरी, स्विय सहाय्यक हेमराज पवार मयूर बाविस्कर शरद साळुंखे, ग्रामस्थ उपस्थित होते.