पालघर: सफाळे रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या पाच जणांवर रेल्वे पोलिसांची कारवाई
पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानकात रेल्वेरूळ ओलांडणाऱ्या पाच प्रवासी, नागरिकांवर रेल्वे पोलिसांनी कारवाई केली आहे. सफाळे रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे फाटक क्रमांक 42 बंद करण्यात आले आहे. मात्र प्रवासी, नागरिक स्वतःचा जीव धोक्यात घालून नियमांचे उल्लंघन रेल्वे ओलांडतात. रेल्वे रूळ लाडणाऱ्या पाच जणांवर रेल्वे पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्या विरोधात पालघर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाअसून न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.