पालघर: विक्रमगड येथून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण, अज्ञातावर पोलिसांत गुन्हा दाखल
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड परिसरात सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीचे जांभा गावठाण ते साखरे या प्रवासादरम्यान अज्ञात इसमाने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिला पळवून नेऊन तिचे अपहरण केले. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवर विक्रमगड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात भारतीय न्याय समितीच्या कलम 137 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.