पालघर: कामण येथे आठ कोटी चार लाख रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त; दोन आरोपींना अटक
वसईतील कामाने येथे सिमेंटचे ब्लॉग बनवण्याच्या कंपनीत सुरू असलेल्या बनवण्याचा कारखाना साकीनाका पोलिसांनी उध्वस्त केला आहे. एमडी ड्रग्स आणि ड्रग्स बनवण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले असून या कारवाईत चार किलो त्रेपन्न ग्रॅम एमडी ड्रग्स पदार्थ जप्त करण्यात आले आहे. या जप्त करण्यात आलेल्या ट्रकची किंमत आठ कोटी चार लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून सादिक सलीम शेख आणि सिराज सुलतान पंचवानी अशी अटक आरोपींची नावे आहेत.