पालघर: नालासोपारा येथे पाकिस्तान झेंडा प्रकरण तीन आरोपींना अटक
नालासोपारा येथे पालकाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करताना पाकिस्तानचा झेंडा रस्त्यावर अंथरणाऱ्या नागरिकांना तीन आरोपींनी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहेm अटक आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.