कामठी: वडोदा मार्गावर भीषण अपघात: दुचाकीचा पोलला धडक, दोन मजुरांचा मृत्यू
Kamptee, Nagpur | Apr 26, 2026 वडोदा मार्गावर एक दुर्दैवी अपघात घडला. वडोदा गावाजवळ असलेल्या स्मशान घाटाच्या वळणावर एका दुचाकीची नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी खांबाला जोरात धडक झाली.या अपघातात दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतकामध्ये शैलेश वानखेडे व नवीन भलावी यांचा समावेश आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी मदतीसाठी प्रयत्न केले, परंतु वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही.