कामठी: युद्ध नको, बुद्ध हवा!' ड्रॅगन पॅलेसमध्ये भव्य शांती मार्च आणि धम्मदेशना; हजारो उपासकांचा सहभाग
बुद्ध जयंती निमित्त जागतिक शांततेचा संदेश देणारे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात आज 'युद्ध नाही, बुद्ध हवा' हा शांततेचा मंत्र घुमला. निमित्त होते विशेष बुद्ध वंदना, धम्मदेशना आणि आयोजित करण्यात आलेल्या भव्य शांती मार्चचे. या सोहळ्याने संपूर्ण परिसर निळ्या जनसागराने आणि 'बुद्धं सरणं गच्छामि'च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.