महाड: मध्य रेल्वे मुंबई-पुणे आणि नागपूर दरम्यान ६ वीकेंड विशेष सेवा चालवणार
Mahad, Raigad | Apr 29, 2026 उन्हाळ्याच्या हंगामात रेल्वे सेवांसाठी प्रवाशांची वाढलेली मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वे ६ वीकएंड विशेष सेवा चालवणार आहे. मुंबई आणि नागपूर दरम्यान ४ सेवा आणि पुणे आणि नागपूर दरम्यान २ सेवा चालविणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वीकएंड स्पेशल (४ सेवा) गाडी क्रमांक 01021 वीकएंड विशेष दि. ०१.०५.२०२६ आणि दि. ०३.०५.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.३० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.४५ वाजता पोहोचेल.