उरण: बंदरात कंटेनर अडकल्याने वृत्तपत्र छपाईवर परिणाम
Uran, Raigad | May 22, 2026 जेएनपीटी बंदरात परदेशातून राज्यातील वृत्तपत्रांसाठी लागणाऱ्या कागदांचे आयात करण्यात आलेले सुमारे 4000 हजार कंटेनर अडकून पडले आहेत. मागील 14 दिवसांपासून अडकून पडलेल्या या कंटेनरमुळे मात्र राज्यातील वृत्तपत्र व छपाई व्यवसाय अडचणीत सापडला आहे. जेएनपीए अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला असून वाहनचालकांच्या तुटवड्यामुळे ही वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती आता कमी अधिक प्रमाणात नियंत्रणात आली आहे.