नागपूर शहर: मनिष नगरमधील हॉटेलमध्ये थरार: रेल्वे कर्मचाऱ्याची प्रेयसीची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न : सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी
पोलीस उपायुक्त सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी यांनी 19 ऑगस्टला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार, मनिष नगरमधील हॉटेल स्टोरिनच्या खोलीत एका तरुणीचा मृत खून झालेला आढळला, तर तरुण गंभीर जखमी अवस्थेत सापडला.मृत तरुणीचे नाव शिवानी राजानंद गजभिये आणि जखमी तरुणाचे नाव किरण संजय आत्राम असून दोघेही रेल्वे कर्मचारी आहेत. याप्रकरणी आरोपी विरोधात बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्त सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी यांनी दिली आहे.