कल्याणमध्ये ३२ अंगणवाडी सेविकांचा सन्मान; २५० चिमुकल्यांना खाऊवाटप!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन; भाजपा नवीन कल्याण मंडळाचा सामाजिक उपक्रम
कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवड्याअंतर्गत भाजपा नवीन कल्याण मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ३२ अंगणवाडी सेविकांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला, तर २५० लहान बालकांना खाऊचे वाटप करण्यात आले.
अंगणवाडी सेविका या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी मोलाचे योगदान देत असतात. त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच चिमुकल्यांना खाऊचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर, नगरसेवक कुमार श्यामल गायकर, कल्याण जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा अर्चना सूर्यवंशी, सरचिटणीस ज्योती भोईर आणि प्रीती दीक्षित, नवीन कल्याण मंडळ महिला मोर्चाच्या अध्यक्षा भावना मनराजा, सरचिटणीस कल्पना पिल्लई, उपाध्यक्षा वंदना कबाडे, सोनाली बोबडे, पौर्णिमा मोरे, वर्षा जोशी, रेश्मा पाटील, सचिव किरण भोसले आणि कन्हैया महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
समाजातील सेवाभावी व्यक्तींचा सन्मान करणे आणि बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे, हीच सेवा पंधरवड्याची खरी भावना असल्याचे भाजपा नवीन कल्याण मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल मनोहर काठे यांनी सांगितले. समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून सेवा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
Kalyan, Thane | Oct 1, 2026