उमरेड: नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; चोरीचा गुन्हा उघड, ३ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
Umred, Nagpur | Apr 13, 2026 बेला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका पंक्चरच्या दुकानात झालेली चोरी स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली असून तीन आरोपींना अटक केली आहे.१० एप्रिल रोजी सोनेगाव लोधी शिवारातील वाहीद जब्बार अंसारी यांच्या दुकानातून नट उघडण्याच्या मशिन, जॅक आणि इतर साहित्य चोरीला गेले होते.