नागपूर शहर: सक्करदरा पोलिसांची कारवाई: हद्दपार इसम जेरबंद
19 ऑगस्टला दुपारी 2:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना, सेवादल नगर, शंकरसाई मठाजवळ एक हद्दपार इसम फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, वर्णनानुसार एक इसम पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले.चौकशीत त्याचे नाव सुशिल उर्फ कोमा उत्तम वाघमारे असल्याचे निष्पन्न झाले.हा आरोपी नागपूर शहर व ग्रामीण हद्दीतून २ वर्षांसाठी हद्दपार असतानाही विनापरवानगी शहरात आला होता.