काटोल: मोठी राजकीय बातमी ,काटोल नगराध्यक्ष अर्चना देशमुख यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Katol, Nagpur | Jul 3, 2026 काटोलच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे.काटोल नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष अर्चना राहुल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. जिल्हा जात पडताळणी समितीने त्यांचे कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरवून रद्द केले होते, या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.