संजय राऊत अंगडियांचे नोकर, भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची खोचक टीका
भाजपचे प्रदेश माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी आज मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० च्या सुमारास खासदार संजय राऊत यांच्या दहा हजार कोटी रुपयांच्या ट्रान्सफरच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. राऊत यांना ही माहिती कशी मिळाली, असा सवाल करत त्यांनी राऊत यांनी अंगडियाचा नवा धंदा सुरू केला आहे का, किंवा ते अंगडियाकडे नोकर म्हणून काम करत होते का, असा खोचक प्रश्न विचारला.