पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते रघुजी भोसले यांच्या तलवारीचे लोकार्पण
श्रीमंत 'सेना साहेब सुभा' राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार इंग्लंडहून परत आणण्याचा अभूतपूर्व क्षण संपुर्ण महाराष्ट्राने अनुभवला. आज सोमवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या तलवारीचे लोकार्पण संपन्न झाले. आंतरराष्ट्रीय नियम व अटींनुसार जपली जाणारी ही तलवार उद्या १९ ते २५ ऑगस्ट २०२५, सकाळी ११.०० ते सायं ७.०० या वेळेत, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथे नागरिकांना दर्शनासाठी खुली राहणार आहे.