आम्ही आवश्यक खबरदारीच्या उपाययोजनांवर चर्चा केली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
आज सोमवार दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.३० च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत आणि २१ ऑगस्टपर्यंत आणखी जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारच्या अलर्ट जारी करण्यात येतील. आम्ही आवश्यक खबरदारीच्या उपाययोजनांवर चर्चा केली.