मुंबईतील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहार तलाव आज ओसंडून वाहू लागला
मुंबईसह उपनगरातील नागरीकांना पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी विहार तलाव आज सोमवार दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी भरुन ओसंडून वाहू लागला आहे. विहार तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता २,७६९.८ कोटी लीटर (२७,६९८ दशलक्ष लीटर) इतकी आहे. अशी प्रतिक्रिया बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या फेसबुक पोस्ट द्वारे दिली आहे.