कामठी: : कामठीत विधान परिषद निवडणुकीसाठी ९९.२९ टक्के मतदान
Kamptee, Nagpur | Jun 18, 2026 नागपूर विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी गुरुवारी कामठी तहसील कार्यालयात शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीत एकूण १४० पैकी १३९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. केवळ एका नगरसेवकाने मतदानाकडे पाठ फिरवली.महायुतीचे डॉ. राजीव पोद्दार आणि महाविकास आघाडीचे अतुल लोंढे यांच्यात येथे थेट लढत होत आहे.