महाड: खंडाळे आयुष्यमान आरोग्य केंद्राला राष्ट्रीय प्रमाणपत्र
Mahad, Raigad | Jun 3, 2026 राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानकांतर्गत अलिबाग तालुक्यातील खंडाळे आयुष्यमान आरोग्य केंद्राने राष्ट्रीय स्तरावर प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वाधिक 92 गुण प्राप्त झालेले खंडाळा हे पहिलेच आयुष्यमान आरोग्य केंद्र ठरले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण सेवेचा हा गौरव झाला आहे. राष्ट्रीय पथकाने खंडाळा येथे मार्चमध्ये आरोग्य केंद्रांची पाहणी केली होती. यानंतर 22 मे रोजी निकाल जाहीर करण्यात आला.