सेलू: सिंदी येथे ड्रायपोर्ट परिसरात दोन जणांनी परप्रांतीय मेंढपाळास केली मारहाण, सिंदी पोलिसांत गुन्हा नोंद
Seloo, Wardha | Oct 29, 2024 मेंढ्या चारण्याच्या कारणावरून 2 जणांनी परप्रांतीय मेंढपाळाला लाठीकाठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी ता. 27 ला सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास सिंदी येथे ड्रायपोर्ट परिसरात घडली. भूषण बेलखोडे वय 25 व प्रशांत जनार्धन बेलखोडे वय 34 दोन्ही राहणार सोनामाता मंदिर सिंदी (रेल्वे) असे आरोपींची नावे असून गोकुलभाई पबाभाई रबारी वय 38 वर्ष राहणार धानेती ता. जिल्हा भुज (गुजरात) असे जखमीचे नाव आहे.