सेलू: केळझर शिवारात वर्धा-नागपूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट वाघाचा मृत्यू, वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल
Seloo, Wardha | Oct 28, 2024 अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या बिबट वाघाचा काही वेळातच घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील केळझर शिवारात उमेश गायकवाड यांच्या बंद असलेल्या धाब्याजवळ वर्धा नागपूर मार्गावर आज ता. 28 सोमवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. वनविभागाला माहिती मिळताच वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येत पंचनामा करून मृत बिबटाला ताब्यात घेतले.