सेलू: जयपूर शेत शिवारात विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू, सेलू पोलिसांत मर्ग दाखल
Seloo, Wardha | Oct 28, 2024 पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण व्हावे याकरिता धुऱ्यावर वीज प्रवाह लावत असतांना शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना ता. 27 रविवारी सायंकाळी 6.30 वाजता तालुक्यातील जयपूर शेत शिवारात उघडकीस आली. शंकर केशव कंडे वय 65 रा. जयपूर असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी फिर्यादीवरून रात्री 11.45 वाजता पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.