सेलू: स्थानीय गुन्हे अन्वेषण पथकाची सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावठी दारूच्या भट्यांवर कारवाई, ₹9,80,900 चा मुद्देमाल नष्ट
Seloo, Wardha | Oct 27, 2024 सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणी, वानरविहिरा, गोहदा, शिवनगाव शिवारात सुरू असलेल्या गावठी मोहा दारूच्या भट्टीवर वर्धा स्थानीय गुन्हे अन्वेषण पथकाने रेड करून मोहा रसायन सडव्यासह 9 लाख 80 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. ही कारवाई ता. 25 शुक्रवारी दुपारी 2.45 वाजता करण्यात आली असून सायंकाळी 6.30 वाजता चार आरोपीविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.