सेलू: आकोली येथे एकास शिवीगाळ करून मारण्याची धमकी, सेलू पोलिसांत गुन्हा नोंद
Seloo, Wardha | Oct 29, 2024 जुना वाद उकरून काढत एकाने शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याची घटना ता. 27 रविवारी सायंकाळी 7.30 वाजता आकोली येथे बाजार चौकात घडली. सचिन दीपक काकडे रा. आकोली यांच्या तक्रारीवरून धीरज सुरेश देवढे रा. आकोली याचे विरुद्ध ता. 28 सोमवाराला सकाळी 11 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला. अशी माहिती ता. 29 ला सेलू पोलिसांनी दिली.