बदनापूर: नजीक पांगरी परिसरात अवैध वाळू साठ्यावर अप्पर पोलीस अधीक्षकांचा छापा, 120 ब्रास वाळूसाठा जप्त
Badnapur, Jalna | Jun 13, 2026 आज दिनांक 13 जून 2026 वार शनिवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार बदनापूर ता. नजीक पांगरी परिसरात अवैधरित्या व चोरट्या मार्गाने साठवून ठेवलेली 120 ग्रास वाळू साठा जालना जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी 12 जून रोजी छापा टाकत जप्तीची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे व साठवून ठेवणाऱ्यांचे धाबे दणाणले असून जालना पोलीस अॅक्शन मोडवर आहे ,तर या कारवाईने सर्वसामान्य नागरिकांमधून समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.