शहादा: प्रकाशा येथे बस स्थानकावर नाशिकच्या महिलेचे १५ हजार आणि १ मोबाईल चोरी, शहादा पोलिसांत गुन्हा दाखल
प्रकाशा येथील बसस्थानकावर नाशिक येथील रहिवासी असलेल्या महिलेची दिशाभूल करीत १५ हजाराची रोकड व मोबाईल काढून घेतल्याची घटना घडली. नाशिक येथील रहिवासी असलेल्या सुशिला गोरख पगार या प्रकाशा येथे आल्या असता अज्ञात चोरट्यांनी त्यांची दिशाभूल करीत त्यांच्याकडे असलेली १५ हजारांची रोकड व मोबाईल असा ऐवज चोरुन नेला. याबाबत सुशिला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहादा पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.