शहादा: विमल हाऊसिंग येथे भागवत कथेत पोथीप्रमुख सतीष अमृती करतात कथा श्रवण
आजचा समाज दिशाहिन झाला असून तरुण पिढी ही व्यसनाधीन झाली आहे यामुळे लहानपणापासूनच मुलांना सुसंस्कृत करावे असे उदगार सत्यबामा अमृत प्रवर्तक समुहाचे पोथीप्रमुख सतिषजी अमृती यांनी नंदुरबार शहरातील विमल हाउसिंग येथे आयोजित भागवत सप्ताह कथेत केले आहे. या सप्ताहात परिसरातील नागरिक कथेचा मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत यानिमित्त विविध कार्यक्रम देखील घेण्यात येत आहे.