शहादा: प्रकाशा येथे संत बाळूमामांच्या पालखीसह ३ हजार मेंढ्यांची गावातून मिरवणूक
प्रकाशा येथे संत बाळूमामांची पालखी तीन हजार मेंढ्यांसह दाखल झाली आहे. नीळकंठेश्वर मंदिरासमोर पालखीचा मुक्काम राहणार आहे. प्रकाशा तीर्थक्षेत्र मंदिराजवळ पालखी मिरवणूक काढण्यात आली. बाळूमामा यांची पालखी मेंढ्यांसह दक्षिण काशी तीर्थक्षेत्र प्रकाशा येथे दाखल झाली आहे. या पालखीचे ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत - ही पालखी प्रकाशा ग्रामस्थांनी काढली यावेळी ग्रामस्थांनी या पालखीचे पूजन केले आहे.