शहादा: सारंगखेडा आणि अनरद येथील दहा जणांनी अनधिकृतपणे वीज जोडणी केल्याने विद्युत वितरणने केली कारवाई
अनधिकृत वीज जोडणीधारकांवर सारंगखेडा व अनरद येथे कारवाई करीत वीज कंपनीने एक लाखाची वीज चोरी उघड केली आहे. १० जणांना तेवढ्या रकमेचे वीज बिल देण्यात आले आहे. अनरद व सारंगखेडा येथे १० जणांनी विना मीटर, विना परवानगी विद्युत पोलवरून वायरच्या साह्याने आकडी टाकून वीज जोडणी घेतल्याचे आढळून आले. या १० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.