धुळे: राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय खेळाडूंचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला सत्कार
Dhule, Dhule | Aug 29, 2024 जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडूंचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस धुळे जिल्ह्यातील विविध खेळामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत जिंकून आलेल्या राष्ट्रीय खेळाडूंचा आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व मानधन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळेस या कार्यक्रमाला विविध शाळेतील क्रीडा शिक्षक तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी होते.