धुळे: लोंढानाला धरणात अक्कलपाडा धरणाचे पाणी सोडावे या मागणीसाठी नेरगाव परिसरात रास्ता रोको आंदोलन
Dhule, Dhule | Aug 29, 2024 धुळे तालुक्यातील नेर गाव परिसरातील ग्रामस्थांनी रास्ता रोको करून प्रशासनाकडे लोंढा नाला प्रकल्प अक्कलपाडा धरणाच्या उजव्या कालव्याच्या माध्यमातून पाणी सोडून भरण्याची मागणी केली आहे, यापूर्वी देखील प्रशासनाकडे ग्रामस्थांनी वारंवार निवेदन देऊन ही मागणी केलेली होती, परंतु प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अखेर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको करून आपला निषेध व्यक्त केला आहे.