धुळे: छ.शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेच्या निषेधार्थ, राष्ट्रवादी अ.प.गटाचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने
Dhule, Dhule | Aug 29, 2024 मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. संबंधित ठेकेदारावर 302 अन्वये गुन्हा दाखल करून त्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.