धुळे: कापडणे गाव परिसरातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण, सोनगीर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Aug 29, 2024 धकापडणे गाव परिसरात राहणार्या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली. फिर्यादीची मुलगी घरातून काहीतरी कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यानंतर बराच वेळ ती घरी परतली नाही. त्यामूळे तिच्या कुटुंबियांनी तिचा घराच्या आजूबाजूला, मैत्रिणींकडे, नातेवाईकांककडे तसेच गावात विविध ठिकाणी शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोनगीर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.