धुळे: पैगंबर जयंती निमित्त निघणारी मिरवणूक १६ ऐवजी १९ सप्टेंबर रोजी, जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत निर्णय
Dhule, Dhule | Aug 29, 2024 गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादुन्नबी तथा मोहम्मद पैगंबर जयंती एकच दिवशी येत असल्याने धुळे जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांच्या सहमतीने दिनांक 16 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादुन्नबी तथा पैगंबर जयंतीच्या निमित्ताने निघणारी मिरवणूक ही 19 सप्टेंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात काढण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.