मुरुड: रोबोटिक बोयोमुळे पुणेकर तरुणीला जीवदान
Murud, Raigad | May 23, 2026 पुणे येथील रहिवासी असलेले आकाश साबळे आणि सिद्धी साबळे हे आपल्या कुटुंबासह काशीद बीचवर आले होते. सकाळी ७.४० वाजताच्या सुमारास हे कुटुंब पोहण्यासाठी पाण्यात उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने २० वर्षीय सिद्धी साबळे ही तरुणी अचानक समुद्राच्या खोल पाण्यात ओढली जाऊ लागली. ती बुडत असल्याचे लक्षात येताच, तिथे कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई प्रविण रोटकर (बकल नंबर १०२८) आणि पोलीस शिपाई जितेंद्र माने (बकल नंबर १५३१) यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या पोलीस कर्मचाऱ्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून खरेदी केलेल्या 'रोबोटिक बोयो' या रिमोट ऑपरेटेड वॉटरक्राफ्टचा वापर केला आणि बुडणाऱ्या सिद्धीला ऐनवेळी सुरक्षित बाहेर काढले.