डोंबिवली रेल्वे पोलिसांची कारवाई ,28 वर्षा नंतर हत्येप्रकरणी फरार आरोपी गजाआड
हत्या करून मृतदेह रेल्वे रुळावर फेकून रेल्वे अपघाताचा बनाव करत आरोपी झाले होते पसार
डोंबिवली रेल्वे पोलिसांनी हप्त्याच्या गुणात फरार असलेल्या एका आरोपीला तब्बल 28 वर्षानंतर बिहार येथून बेड्या ठोकल्या आहेत .संदीप कृष्णन असे अटक आरोपीचे नाव असून त्याचे प्रमोद यादव, विनेश कृष्णन हे दोन साथीदार अद्यापही पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही .
1998 म्हणजेच तब्बल 28 वर्षांपूर्वी कोपर डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान शैलेश मोरे नावाच्या इसमाचा मृतदेह छिन्न विच्छिन अवस्थेत आढळला होता . रेल्वे पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला प्रथमदर्शनी रेल्वे अपघात असल्याचे वाटत असले तरी पोलिसांना संशयाला त्यांनी या प्रकरणी तपास सुरू केला . तपासांती या इसमाची हत्या करून त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकण्यात आला होता असे निष्पन्न झाले . पोलिसांनी शैलेश मोरे यांचा ठावठिकाणा तसेच त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला याच दरम्यान पोलिसांनी संदीप कृष्णन , प्रमोद यादव विनेश कृष्णन या तिघांना चौकशीसाठी बोलावले पोलिसांना या तिघांवर संशय होता मात्र जबाब घेऊन त्यांना सोडून देण्यात आले होते त्यानंतर हे तिघेही पसार झाले पोलीस तपासात या तिघांनी शैलेश मोरे यांचे हत्या केल्याचे निष्पन्न झाले . शैलेश मोरे हा संदीप कृष्णन यांच्या बहिणीचा पती होता मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांचा काडीमोड झाला होता . बहिणीशी शैलेश मोरे याने काडीमोड घेतल्याचा राग संदीप कृष्णन याला होता ,याच रागातून संदीप कृष्णन याने त्याचे साथीदार विनेश कृष्णन आणि प्रमोद यादव याना बोलावलं .शैलेश मोरे याला दारू पाजून त्याची दगडाने ठेचून हत्या केली .त्यानंतर शैलेश याचा मृतदेह कोपर डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान रुळावर फेकून पळ काढला .त्यांनी रेल्वे अपघाताचा बनाव केला होता . मात्र रेल्वे पोलिसांच्या तपासात त्यांच्या या बनावाचा पर्दाफाश झाला . रेल्वे पोलीस तब्बल 28 वर्षांपासून या तिघांच्या मागावर होते यामधील संदीप कृष्णन हा बिहारला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तत्काळ तांत्रिक तपास तसेच बातमीदारांच्या आधारे संदीप कृष्णाचा ठाव ठिकाणे मिळवत सापळा रसत संदीप कृष्णाला बिहार येथून ताब्यात घेतले त्याचे दोन साथीदार अद्याप पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत
Kalyan, Thane | Oct 20, 2026