म्हसळा: म्हसळा नगराध्यक्षपदाची 7 मे ला निवडणूक नगरसेवकांमधूनच होणार निवड
Mhasla, Raigad | Apr 28, 2026 म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक 7 मे रोजी होणारआहे. तसा कार्यक्रम जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेला आहे. नगरपंचायतीमध्ये झालेल्या राजकीय घडामोडींमुळे ही निवडणूक होणार आहे. सभागृहाच्या 17 सदस्यांपैकी केवळ 10 नगरसेवकांनाच मतदानाचा अधिकार असून, 7 जणांना पक्षांतर कायद्यान्वये अपात्र ठरविण्यात आलेले आहे. त्यावरही सोमवारीच सुनावणी होणार आहे. विद्यमान नगरपंचायतीची मुदत फेब्रुवारी 2027 पर्यंत असल्याने या काळात नगराध्यक्षपदी कोण विराजमान होते याबाबत राजकीय वर्तुळातउत्सुकता लागलेली आहे.