उमरेड: झारखंडमधून ३३ किलो अफूसह कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त, आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
Umred, Nagpur | May 27, 2026 नागपूर ग्रामीणच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने आंतरराज्यीय ड्रग्ज तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश करत एक मोठी यशस्वी कारवाई केली आहे. पोलिसांनी झारखंडमधील सिमडेगा येथून ३३.७६७ किलोग्राम अफू.आणि २३,३५,००० रुपये रोख रक्कमेसह एकूण १,९२,३६,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.