बदनापूर: देवगाव फाट्यावर आढळला अज्ञात तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह ,परिसरात खळबळ
आज दिनांक 4 एप्रिल 2026 वार शनिवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील देवगाव फाट्यावर खुल्या जागेवर रक्ताच्या थारोळ्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे याची माहिती स्थानिकांनी तात्काळ बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरवसे यांना देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची पाहणी केली असून अद्याप ओळख पडलेली नाही मात्र त्याच्या डोक्याला व हाता पायाला जबर मार लागल्याने तो रक्ताच्या ठरवण्यात पडला होता याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास करत आहे.